वर्ष 2005 मध्ये माझे मित्र जेष्ठ बंधू कौटुंबिक स्नेही स्वर्गीय विकास पाटील यांच्या शेतात आम्ही मित्रांनी डबा पार्टी केली होती.त्यावेळी मी माझ्या डब्बात साक्षात अन्नपूर्णा असलेल्या मोठी ताई व आईने बनवलेल्या काळा मसाल्याची भाजी व भाकरी होती. काळया रस्याची भाजी विकास पाटील अनिल बोरसे, फरकाडे काका यांना एवढी आवडली की बास "असे जेवण हॉटेलमध्ये मिळाले तर रांगा लागतील" असे म्हणून ते तृप्त झाले. आणि त्याचवेळी खरी काळे बंधू रेस्टॉरंट ची मुर्हतमेढ रोवली हा व्यवसाय करावा की काय हा विचार मनात आला.या विचाराला सत्यात उतरवण्यासाठी विकास पाटील यांनी तन मन धना नी मदत केली व माझ व्यावसायिक बनण्याचं स्वप्न विकास पाटील यांनी सत्यात उतरवलं यासाठी त्यांनी ओळखीच्या ठिकाणी मला रेस्टॉरंट सुरू करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली. स्वखर्चाने मला रेस्टॉरंट चालू करून दिले त्यावेळी माझे परममित्र प्रशांत नांदेडकर आणि नंदकुमार दौंड तसेच मेघराज बरबडे यांनी सर्व मदत करून व्यवसाय सेट करण्यासाठी मदत केली.
आमच्य हॉटेल ची विविधता ही आहे की पूर्वी रेस्टॉरंट फक्त काळया रस्याच्या भाजीसाठी प्रसिद्ध होते परंतु आता सर्व प्रकारचे पदार्थ मिळावे अशी सूचना श्री रमेश इधाटे, श्री शिवाजी दांडगे तसेच श्री सुरेश जुये यांनी केली. ते पदार्थ काळया रस्यात इतकेच चविष्ट आणि गुणवत्ता पूर्ण असावे यासाठीची सूचना श्री मनोज गायके यांनी केली. आणि खरच नार्थ इंडियन पदार्थ जसे की पनीर मसाला, काजू करी सुद्धा ग्राहक काळे रस्यातीलच आर्डर करतात व तृप्ती ची ढेकर देतात ग्राहकांच समाधान हेच आमच आनंद.
आमच्या हॉटेल ची नाविन्यता ही आहे की या सर्व प्रवासात वेळो वेळी आमच्या बंधूचे सहकार्य मिळाले.काळानुसार बदलले पाहिजे यासाठी जे बदल करावे लागतात त्यासाठी पत्नी सौ मीना आणि भाची दिपाली व ज्योती ,मुले शंतनू आणि हर्षवर्धन यांचा मोठा सहभाग असतो .ग्राहकांच्या प्रतिक्रिया आणि असलेल्या मार्गदर्शक सूचना ऐकून घेऊन वेळोवेळी बदल केले जातात.त्यासाठी निलेश ठोकळे, सतीश तवार ही त्यांच्या क्षेत्रातील दिग्गज मंडळी नेहमी लक्ष ठेवून असतात.पायाभूत बदलासाठी नामांकित वास्तु विशारद श्री गणेश म्हारोळकर सर यांचे मार्गदर्शन असते. रेस्टॉरंट मधील कार्यपद्धतीवर लक्ष ठेवण्यासाठी जुनी निष्ठावंत टीम आहे.आमच्याकडे काम करणाऱ्या कामगारांना कुटुंबाचा भाग समजतो केवळ ग्राहकांच समाधान हेच आपल कमाई मानतो.
गुणवत्ता हेच भांडवल समजतो मी विप्रो सारख्या कंपनीत काम केलो आहे नवनीत पब्लिकेशन मध्ये काम केले आहे अझीम प्रेमजी व जितूभाई गाला यांच सांगण असत की आपण स्पर्धेत टिकून राहयच तर पहिल्या तीन मध्येच राहयच
We are available by phone. You can also use our
quick contact form to ask a question about our products.